Covid-19 vaccination : 12 ते 14 वयोगटातील मुलांना बुधवारपासून मिळणार कोरोना प्रतिबंधात्मक लस

एमपीसी न्यूज – 12 ते 14 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला येत्या बुधवारपासून (दि.16) प्रारंभ होणार आहे. तसेच, 60 वर्षावरील नागरिकांसाठी प्रिकॉशनरी डोस उपलब्ध होईल. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी ही माहिती दिली आहे.

12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांसाठी तसेच 60 वर्षांवरील नागरिकांसाठी प्रिकॉशनरी डोस बुधवारपासून (दि.16) उपलब्ध होईल, असे ट्विट केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी केले आहे.

सर्व पात्र मुला -मुलींनी व 60 वर्षावरील नागरिकांनी लस घ्यावी असे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.