Pimpri News : महापालिका निवडणुकीत शहरातील सुज्ञ जनता ‘आप’ला स्वीकारेल – मुकुंद किर्दत

एमपीसी न्यूज – दिल्लीनंतर पंजाबच्या जनतेने आम आदमी पार्टीला स्वीकारले. पंजाबच्या जनतेने ज्याप्रमाणे आपला स्वीकारले. त्याप्रमाणे आगामी महापालिका निवडणुकीत पिंपरी-चिंचवड मधील सुज्ञ जनता सुद्धा आम आदमी पार्टीला नक्कीच स्वीकारेल असा विश्वास आपचे पुणे जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी व्यक्त केला.

आम आदमी पार्टीचा स्वराज्य संकल्प मेळावा आचार्य अत्रे सभागृहात रविवारी (दि.13) पार पडला. महापालिकेसाठी इच्छुक असलेल्या आपच्या उमेदवारांनी स्वराज्य संकल्प मेळाव्याचे आयोजन केले होते. कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे, प्रचार प्रमुख राज चाकणे, शहराध्यक्ष अनुप शर्मा, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष वहाब शेख, महेश बिराजदार आणि महिला शहराध्यक्ष स्मिता पवार उपस्थित होते.

महापालिकेने अनधिकृत ठरविलेल्या घरांमध्ये शहरातील 30 टक्के लोकसंख्या राहते. सत्ताधा-यांनी ही घरे अधिकृत करण्याच्या निर्णयाचा जो गाजावाजा करत प्रचार केला. त्या प्रक्रियेद्वारे आकारले जाणारे शुल्क हे सर्वसामान्यांना परवडणारे नसेल तर असल्या फसव्या घोषणा काय कामाच्या? असा प्रश्न कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी उपस्थित केला.

या मेळाव्यात नंदू नारंग, डॉ. रामेश्वर मुंडे, वैजनाथ शिरसाठ, डॉ. अमोल डोंगरे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात इच्छुक उमेदवारांच्या वतीने आपले विचार मांडले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कपिल मोरे व मंगेश आंबेकर यांनी केले. तर, यशवंत कांबळे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.