Chinchwad : मागील दोन दिवसांत टाळेबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणा-या 267 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – टाळेबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मागील दोन दिवसात 267 जणांवर कारवाई केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दररोज 800 ते 1000 रुग्णांची भर पडत आहे. यामुळे शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाकडून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी टाळेबंदीची घोषणा करण्यात आली आहे. टाळेबंदीचे नियम नागरिकांनी पाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. मात्र,काही नागरिक या नियमांना पायदळी तुडवत आहेत.

शासनाकडून टप्प्याटप्प्यात टाळेबंदीच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात येत आहे. अनेक दुकाने आणि अस्थापना अजूनही बंद आहेत. त्यातच शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा अजूनही बंद असल्याने नागरिकांची मोठी हेळसांड होत आहे. त्यात टाळेबंदीच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास पोलीस कारवाई करीत आहेत. त्यामुळे प्रशासनासह नागरिक देखील तारेवरची कसरत करीत आहेत.

मागील दोन दिवसात (शुक्रवार, दि. 14 आणि शनिवार दि. 15) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार केलेली कारवाई पुढीलप्रमाणे –

एमआयडीसी भोसरी (77), भोसरी (20), पिंपरी (17), चिंचवड (17), निगडी (9), आळंदी (8), चाकण (5), दिघी (20), म्हाळुंगे चौकी (1), सांगवी (7), वाकड (9), हिंजवडी (22), देहूरोड (2), तळेगाव दाभाडे (10), तळेगाव एमआयडीसी (0), चिखली (26), रावेत चौकी (0), शिरगाव चौकी (7)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.