Chinchwad News : शहरात आणखी आठ चोरीच्या घटना उघड; 18 लाख 71 हजारांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत या चोरट्यांनी पोलिसांना जेरीस आणले आहे. आळंदी येथे चोरट्यांनी जिलेटिनचा स्फोट करून एटीएम मशीन मधून 16 लाख 51 हजार 80 रोकड पळवली. तसेच चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विविध पोलीस ठाण्यातून सहा दुचाकी, एक मोबाईल फोन चोरीला गेला आहे.

पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिंबळी येथे ॲक्सिस बँकेचे एटीएम फोडून तीन चोरट्यांनी 16 लाख 51 हजार 400 रुपयांची रोकड चोरून नेली आहे. परिसरात पोलीस गस्त घालून गेल्यानंतर चोरट्यांनी लक्ष ठेवून हा प्रकार केला आहे. चोरटे नेमके कोणत्या दिशेला गेले हे अजूनही पोलिसांना समजलेले नाही. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिखली, आळंदी, देहूरोड, सांगवी आणि पिंपरी पोलीस ठाण्यात वाहनचोरीचे सहा गुन्हे दाखल आहेत. या सर्व गुन्ह्यात चोरट्यांनी दुचाकी वाहने चोरून नेली आहेत. या प्रकरणी रविवारी (दि. 26) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

वाकड पोलीस ठाण्यात चोरीचा एक गुन्हा दाखल आहे. त्यात अज्ञात चोरट्यांनी वीस हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन चोरून नेला आहे. या आठ घटनांमध्ये चोरट्यांनी तब्बल 18 लाख 71 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.