Pune News : कंत्राटी काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

एमपीसी न्यूज : सिटी सर्वे कार्यालय, खडकमाळ येथील (Pune News) कंत्राटी काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यावर 10 हजर रुपयांची लाच मागणी प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग (ला. पर. वि) पुणे यांनी कारवाई केली आहे.

याबाबत 31 वर्षीय पुरुषाने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्याकडे तक्रार दिली होती. याप्रकरणी लक्ष्मी लावरे ( कंत्राटी पद्धतीने काम करणारी महिला ) यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7 (अ) अन्वये खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तक्रारदार यांनी त्यांच्या मालमत्तेची (घर व जागा) वारस नोंद घेण्यासाठी हवेली सिटी सर्व्हे कार्यालय अंतर्गत कमाल कार्यालयातील परीक्षण भूमक यांना भेटून कागदपत्रांची पूर्तता केली होती.

Akurdi News : डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजबाहेर एका विद्यार्थ्याचा दुसऱ्या विद्यार्थ्यावर चाकूहल्ला

त्यानंतर त्या कार्यालयातील कंत्राटी काम करणाऱ्या महिला कर्मचारी लक्ष्मी डावरे यांनी ती नोंद घेण्यासाठी त्यांच्यासाठी व परीक्षण भूमापक यांच्यासाठी 10,000 रुपयांची लाचेची मागणी केल्याची तक्रार ला.प्र.वि. पुणे येथे दिली होती.

त्या तक्रारीची पडताळणी केली असता तक्रारदार यांच्या मालमत्तेच्या वारस नोंदीसाठी लक्ष्मी लावरे यांनी तडजोडी आणती त्यांच्या स्वतःसाठी व परीक्षण भूमापक यांच्यासाठी 6,000 रुपये (Pune News) लाचेची मागणी केली म्हणून लावरे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उप आयुक्त/ पोलीस अधीक्षक अमोल तांबे ला.प्र.वि पुणे परिक्षेत्र, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, ला.प्र.वि पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.