Corona World Update: Good News! रुग्णांच्या ‘इन कमिंग’ पेक्षा ‘आऊट गोईंग’ वाढले, सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या घटली

Corona World Update: Good News! Number of corona free patients is higher than new patients, count of active patients declined

एमपीसी न्यूज – जगात काल (बुधवारी) आढळलेल्या नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येपेक्षा, कोरोनामुक्त होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे जगातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आणखी कमी झाली आहे. बुधवारी जगात एकूण 1 लाख 21 हजार 413 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, त्याच वेळी तब्बल 1 लाख 53 हजार 699 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जगातील कोरोनामुक्तांची टक्केवारी 48.25 टक्क्यांपर्यंत वाढली असून सक्रिय रुग्णांची टक्केवारी 45.84 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. हा बदल कोरोना विरुद्धच्या लढाईत मोठा आशादायी मानला जात आहे.

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 65 लाख 68 हजार 510 इतकी झाली असून आतापर्यंत एकूण 3 लाख 87 हजार 957(5.91 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 31 लाख 69 हजार 243 (48.25 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 30 लाख 11 हजार 310 (45.84 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 29 लाख 57 हजार 110 (98 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 54 हजार 200 (2 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

28 मे – नवे रुग्ण 1 लाख 16 हजार 304, मृतांची संख्या 4 हजार 612

29 मे – नवे रुग्ण 1 लाख 25 हजार 511, मृतांची संख्या 4 हजार 872

30 मे – नवे रुग्ण 1 लाख 24 हजार 102, मृतांची संख्या 4 हजार 084

31 मे – नवे रुग्ण 1 लाख 08 हजार 767,  मृतांची संख्या 3 हजार 191

1 जून – नवे रुग्ण 1 लाख 03 हजार 050, मृतांची संख्या 3 हजार 017

2 जून – नवे रुग्ण 1 लाख 15 हजार 215, कोरोनामुक्त 1 लाख 07 हजार 201, मृतांची संख्या 4 हजार 669 

3 जून – नवे रुग्ण 1 लाख 21 हजार 413,  कोरोनामुक्त 1 लाख 53 हजार 699, मृतांची संख्या 4 हजार 929

अमेरिकेत कोरोना संसर्ग 19 लाखांपर्यंत वाढला

अमेरिकेत बुधवारी 1,083 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबळींचा आकडा 1 लाख 09 हजार 142 पर्यंत पोहचला आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 19 लाख 01 हजार 783 झाली आहे तर 6 लाख 88 हजार 670 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

US Corona Death Toll: अमेरिकेत अवघ्या 88 दिवसांत कोरोनाचे 1,00,000 बळी!

ब्राझीलमध्ये एका दिवसातील कोरोना बी अमेरिकेपेक्षाही जास्त 

ब्राझीलमध्ये बुधवारी 1,269 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. बाझीलमधील कोरोना मृतांची संख्या आता 32,547 झाली आहे. ब्राझीलमधील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 5 लाख 83 हजार 980 झाली आहे तर 2 लाख 66 हजार 132 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.

मेक्सिकोमध्ये काल (बुधवारी) 470, इंग्लंडमध्ये 359, भारतात 259, रशियात 178, पेरूमध्ये 127 तर कॅनडामध्ये 103 कोरोनाबाधितांचे बळी गेले आहेत.  चिलीमध्ये 87,  फ्रान्स 81, स्वीडन 74, इटली 71, इराण 70,  पाकिस्तान 67 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 19,01,783 (+20,578), मृत 1,09,142 (+1,083)
  2. ब्राझील – कोरोनाबाधित 5,83,980 (+27,312), मृत 32,547 (+1,269)
  3. रशिया – कोरोनाबाधित 4,32,277 (+8,536), मृत 5,215 (+178)
  4. स्पेन – कोरोनाबाधित 2,87,406 (+394), मृत 27,128 (+1)
  5. यू. के. – कोरोनाबाधित 2,79,856 (+1,871), मृत 39,728 (+359)
  6. इटली – कोरोनाबाधित 233,836 (+321), मृत 33,601 (+71)
  7. भारत – कोरोनाबाधित 216,824 (+9,633) , मृत 6,088 (+259)
  8. जर्मनी – कोरोनाबाधित 184,425 (+334), मृत 8,699 (+25)
  9. पेरू –  कोरोनाबाधित 178,914 (+4,030) , मृत 4,894 (+127)
  10. टर्की – कोरोनाबाधित 166,422 (+867), मृत 4,609 (+24)
  11. इराण – कोरोनाबाधित 160,696 (+3,134), मृत 8,012 (+70)
  12. फ्रान्स – कोरोनाबाधित 151,677 (+352), मृत 29,021 (+81)
  13. चिली – कोरोनाबाधित 113,628 (+4,942), मृत 1,275 (+87)
  14. मेक्सिको – कोरोनाबाधित 97,326 (+3,891), मृत 10,637 (+470)
  15. कॅनडा –  कोरोनाबाधित 93,085 (+675), मृत 7,498 (+103)
  16. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 91,182 (+2,171) मृत 579 (+30)
  17. चीन – कोरोनाबाधित 83,021 (NA), मृत 4,634 (+NA)
  18. पाकिस्तान – कोरोनाबाधित 80,463 (+4,065), मृत 1,688 (+67)
  19. कतार – कोरोनाबाधित 62,160 (+1,901), मृत 45 (+2)
  20. बेल्जियम – कोरोनाबाधित 58,685 (+70), मृत 9,522 (+17)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.