Corona World Update: एका दिवसात सर्वाधिक 2.79 लाख नवे रुग्ण तर 2.39 लाखांना डिस्चार्ज

Corona World Update: Record break 2.79 lakh new patients and 2.39 lakh discharges in a single day जगातील 60.81 टक्के रुग्ण कोरोनामुक्त, 4.10 टक्के रुग्णांचा मृत्यू तर 35.09 सक्रिय रुग्ण

एमपीसी न्यूज – जगातील कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 53 लाखांच्या पुढे गेली असून त्यापैकी 93 लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्तांची टक्केवारी 60.81 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. कोरोना बळींचा आकडा सहा लाख 30 हजारांच्या पुढे गेला असला तरी कोरोना रुग्णांचा मृत्यूदर 4.10 टक्क्यांपर्यंत तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण 35.09 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. काल (बुवारी) जगभरात 2 लाख 79 हजार नवीन कोरोना रुग्णांची भर पडली तर 2 लाख 39  हजारपेक्षा अधिक कोरोनामुक्त झाले. हे दोन्ही आकडे आतापर्यंतचे सर्वाधिक आहेत. 

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 1 कोटी 53 लाख 73 हजार 616 झाली असून आतापर्यंत एकूण 6 लाख 30 हजार 193 (4.10 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 93 लाख 49 हजार 201 (60.81 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 53 लाख 94 हजार 222 (35.09 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 53 लाख 27 हजार 981 (98.81 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 66 हजार 241 (1.19 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

16 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 48 हजार 914, कोरोनामुक्त 2 लाख 41 हजार 335, मृतांची संख्या 5 हजार 741

17 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 40 हजार 681, कोरोनामुक्त 1 लाख 76 हजार 369, मृतांची संख्या 5 हजार 583

18 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 24 हजार 065, कोरोनामुक्त 1 लाख 51 हजार 019, मृतांची संख्या 5 हजार 008

19 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 20 हजार 073, कोरोनामुक्त 1 लाख 23 हजार 557, मृतांची संख्या 4 हजार 316

20 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 05 हजार 348 , कोरोनामुक्त 1 लाख 71 हजार 684 , मृतांची संख्या 4 हजार 046

21 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 39 हजार 093 , कोरोनामुक्त 2 लाख 03 हजार 626 , मृतांची संख्या 5 हजार 678

22 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 79 हजार 769 , कोरोनामुक्त 2 लाख 39 हजार 108 , मृतांची संख्या 7 हजार 113

अमेरिकेतील कोरोना संसर्ग 42 लाखांच्या उंबरठ्यावर 

अमेरिकेत बुधवारी 71 हजार 967 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 41 लाख 875 झाली आहे. बुधवारी अमेरिकेत 1 हजार 205 कोरोनाबाधितांचे बळी गेले आहेत. त्यामुळे अमेरिकेतील कोरोना बळींचा आकडा 1 लाख 46 हजार 183 पर्यंत वाढला आहे. अमेरिकेत 19 लाख 42 हजार 637 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून अजून अमेरिकेत 20 लाख 12 हजार 055 सक्रिय रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. 

ब्राझीलमध्ये बुधवारी 1 हजार 293 कोरोना बळी

ब्राझीलमध्ये बुधवारी 1 हजार 293 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे ब्राझीलमधील कोरोना बळींचा आकडा 82 हजार 890 वर पोहचला आहे. ब्राझीलमधील कोरोनाबाधितांची संख्या 22 लाख 31 हजार 871 झाली असून त्यापैकी 15 लाख 32 हजार 138 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आता ब्राझीलमध्ये 6 लाख 16 हजार 843 सक्रिय कोरोना रुग्ण उरले आहेत.

मेक्सिकोतील कोरोना बळींचा आकडा 40,400 वर

मेक्सिकोत बुधवारी 915 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे मेक्सिकोतील कोरोना बळींचा आकडा 40 हजार 400 झाला आहे. मेक्सिकोतील कोरोना संसर्ग आता 3 लाख 56 हजार 255 पर्यंत वाढला आहे. त्यापैकी 2 लाख 27 हजार 165 रुग्ण बरे झाले असून 88 हजार 690 रुग्ण सक्रिय आहेत.

भारतात बुधवारी 1,120 कोरोना बळी

भारतात बुधवारी 1,120 कोरोनाबाधित मृत्यूंची नोंद झाली. दक्षिण अफ्रिकेत 572, इराणमध्ये 219, कोलंबियात 207, , पेरूत 188, रशियात 165, इंडोनेशियात 139 कोरोना बळी गेले. अर्जेंटिनात 98, इराकमध्ये 92, इंग्लंडमध्ये 79, बोलिवियात 55 तर इक्वाडोरमध्ये 52 कोरोना मृत्यू नोंदविले गेले.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 41,00,875 (+71,967), मृत 1,46,183 (+1,205)
  2. ब्राझील – कोरोनाबाधित 22,31,871 (+65,339), मृत 82,890 (+1,293)
  3. भारत – कोरोनाबाधित 12,39,684 (+45,599) , मृत 29,890 (+1,120)
  4. रशिया – कोरोनाबाधित 7,89,190 (+5,862), मृत 12,745 (+165)
  5. दक्षिण अफ्रिका – कोरोनाबाधित 3,94,948 (+13,150), मृत 5,940 (+572)
  6. पेरू – कोरोनाबाधित 3,66,550 (+4,463), मृत 17,455 (+188)
  7. मेक्सिको – कोरोनाबाधित 3,56,255 (+6,859), मृत 40,400 (+915)
  8. चिली – कोरोनाबाधित 3,36,402 (+1,719), मृत 8,722 (+45)
  9. स्पेन –  कोरोनाबाधित 3,14,631 (+1,357), मृत 28,426 (+2)
  10. इंग्लंड – कोरोनाबाधित 2,96,377 (+560), मृत 45,501 (+79)
  11. इराणकोरोनाबाधित 2,81,413 (+2,586), मृत 14,853 (+219)
  12. पाकिस्तान – कोरोनाबाधित 2,67,428 (+1,332), मृत 5,677 (+38)
  13. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 2,58,156 (+2,331), मृत 2,601 (+44)
  14. इटली – कोरोनाबाधित 2,45,032 (+280), मृत 35,082 (+9)
  15. टर्की – कोरोनाबाधित 2,22,402 (+902) मृत 5,545 (+19)
  16. कोलंबिया – कोरोनाबाधित 2,18,428 (+7,390), मृत 7,373 (+207)
  17. बांगलादेशकोरोनाबाधित 2,13,254 (+2,744), मृत 2,751 (+42)
  18. जर्मनी – कोरोनाबाधित 2,04,470 (+580), मृत 9,182 (+2)
  19. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,78,336 (+998), मृत 30,172 (+7)
  20. अर्जेंटिना –  कोरोनाबाधित 1,41,900 (+5,782), मृत 2,588 (+98)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.