Sangvi Crime News : टीडीआर मिळवून देण्याच्या बहाण्याने वृद्ध शेतकऱ्याची फसवणूक

36.40 लाख रोख आणि तीन फ्लॅट आरोपींकडून लूट

एमपीसी न्यूज – महापालिकेकडून विकास हक्काचे हस्तांतरण (टीडीआर) मिळवून देण्याचे अमिष दाखवून टीडीआरची फाईल लक्ष्मण जगताप यांच्या फाईलमध्ये ठेवली असल्याने ती अडकली असल्याचे सांगत पती पत्नीने एका वृद्ध शेतक-याकडून 36 लाख 40 हजार रोख रक्कम घेतली तसेच शेतक-याच्या नावावरील तीन फ्लॅट नावावर करून घेत फसवणूक केली. हा प्रकार सन 2013 पासून 19 जानेवारी 2022 या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडला आहे.

रमाकांत पांडुरंग पाटील (वय 68, रा. बोरखळ, ता. जि. सातारा) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विजय शंकर गायकवाड, पुष्पा विजय गायकवाड (दोघे रा. कासारवाडी, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाटील यांच्या पिंपळे गुरव येथील मिळकतीवर महापालिकेकडून टीडीआर मिळवून देण्याचे विजय गायकवाड याने फिर्यादी यांना आमिष दाखवले. आपली टीडीआरची फाईल लक्ष्मण जगताप यांच्या फाईलमध्ये ठेवली असता, आपल्यामुळे त्यांची फाईल अडकवली आहे. त्याबाबत पोलीस कम्प्लेंट होऊ नये यासाठी आरोपींनी पाटील यांच्याकडून सुमारे 36 लाख 40 हजार रुपये घेतले. पाटील यांच्या वेगवेगळ्या कागदपत्रांवर सह्या घेऊन त्यांच्या मालकीचे विघ्नहर्ता क्लासिक येथील तीन फ्लॅट आरोपींनी त्यांच्या नावावर करून घेत पाटील यांची फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक काळू शंकर गवारी तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.