Pune News : टपरीवरचा चहा पिण्यासाठी देवेंद्र फडणवीस इंदापुरात?

एमपीसी न्यूज : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे टपरीवरचा चहा पिण्यासाठी इंदापूरला जातात. ऐकून आश्चर्य वाटलं ना.. पण हो हे खरंच आहे.. देवेंद्र फडणवीस मागील अनेक वर्षापासून चहा पिण्यासाठी इंदापूर येथे जात असतात.. तेही चहा वाल्या दशरथ राऊत यांच्या मैत्रीखातर..

म्हणतात ना, जेव्हा एखाद्या सोबत मैत्री होते तेव्हा गरीब-श्रीमंत उच्च नीच असा भेदभाव नसतो.. तशीच काहीशी मैत्री देवेंद्र फडणवीस आणि चहावाले दशरथ राऊत यांची आहे.. या दोघातील मैत्रीचा हा विषय इंदापूर आणि बारामती परिसरात चर्चेचा ठरला आहे.. पदाला न जुमानता देवेंद्र फडणवीस न चुकता या चहावाल्याचा चहा पिल्याशीवाय जात नाहीत.

इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंगपूर या गावात असलेल श्री लक्ष्मी नृसिंह हे फडणवीस यांचे कुलदैवत आहे. वर्षातून एकदा तरी ते याठिकाणी सहकुटुंब दर्शनासाठी येत असतात. यातूनच त्यांची दशरथ राऊत यांच्याशी मैत्री झाली. प्रत्येक वेळी ते या ठिकाणी आल्यानंतर राऊत यांच्या टपरीवजा हॉटेलात जातात आणि चहा घेतात.

याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, कुलदैवताच्या दर्शनासाठी मी या ठिकाणी नेहमी येत असतो. मागील 25 वर्षापासून मी या ठिकाणी येत असतो. यातूनच मंदिरासमोर असणाऱ्या दशरथ राऊत यांच्याशी माझा परिचय झाला आणि त्याचं रुपांतर आता मैत्रीत झाल आहे. त्यामुळे मी जेव्हा जेव्हा या ठिकाणी येतो तेव्हा तेव्हा चहा पिऊन जातो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.