Pune News : पाणी भरण्याच्या वादातून येरवडा कारागृहात तुफान हाणामारी, दोघे गंभीर जखमी

एमपीसी न्यूज : पुण्यातील येरवडा कारागृहामध्ये पाणी भरण्यावरून झालेल्या वादातून दोन कैद्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. यामध्ये दोघे जण जखमी झाले आहेत. येरवडा कारागृहात असलेल्या सर्कल क्रमांक एक कार्यालयामोर वाद झाला. या मारहाणप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक देखील केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे चक्क पत्र्याने यावेळी मारहाण करण्यात आली आहे. 

टिकलसिंह आणि अजिनाथ गायकवाड यांचा सोनू शेटे आणि किशोर मंजुळेसोबत वाद झाला. सुरुवातील बाचाबाची होऊन नंतर हा वाद ताणला गेला आणि बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीत झालं. चक्क सिमेंटच्या पत्र्याने मारहाण करत कैदी एकमेकांमध्ये भिडले.

हा वाद वाढत गेला आणि थेट हाणामारीलाच सुरुवात झाली. या मारहाणीवेळी टिकलसिंग आणि अजितनाथ यांनी सोनू शेटे आणि किशोर मंजुळेवर सिमेंटच्या पत्र्याने मारहाण केली. यात जखमी झालेल्या शेटे आणि मंजुळे या दोन्ही कैद्यावर तत्काळ उपचारही करण्यात आलेत.

या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करुन घेत दोघांवर अटकेची कारवाई केली आहे. या मारहाण प्रकरणी कारगृह पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेत दोघा कैद्यांवर कारवाई देखील केली आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शेलार हे अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.