Nashik News : यामुळे संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकरांच्या रेखाचित्राला रिकाम्या खुर्चीवर ठेवून सोहळा

एमपीसी न्यूज : 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते उपस्थित राहिले नाही. अखेर आयोजकांनी संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकरांच्या रेखाचित्राला रिकाम्या खुर्चीवर विराजमान करत आयोजकांनी सोहळा निभावून नेला.

नाशिकच्या कुसुमाग्रज नगरीत सुरू झालेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त आयोजित कार्यक्रम आणि विशेषतः ग्रंथदिंडी विशेष लक्षवेधी ठरली. त्यामुळे उद्घाटन सोहळ्याकडेदेखील सर्वांचं लक्ष लागून होतं.

मात्र, अपेक्षेप्रमाणे संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर स्वतःच अनुपस्थित असल्यानं त्यांची खुर्ची रिकामीच होती. त्यामुळे आयोजकांनी डॉ. नारळीकरांचं रेखाचित्र ठेवत सोहळा साजरा केला. डॉ. नारळीकरांच्या उपस्थितीबाबत शेवटच्या क्षणापर्यंत अनिश्चितता होती. त्यांना आणण्यासाठी थेट हेलिकॉप्टरची व्यवस्थादेखील करण्यात आली होती. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते उपस्थित राहणार नसल्याचं सांगण्यात आलं.

डॉ. नारळीकर यांच्या भाषणातील सारांश.

मराठीचे अपूर्णत्व सर्वात जास्त जर कुठे जाणवत असेल तर ते विज्ञान-साहित्यात. विसावे शतक हे विज्ञानाचे शतक म्हटल्यास चूक ठरणार नाही. आइन्स्टाइनचा सापेक्षतावाद आणि प्लांक-आइन्स्टाइन-बोर यांचा पुंजवाद हे दोन महत्वाचे मूलभूत सिद्धांत या शतकाच्या पहिल्या 15 वर्षात भौतिकशास्त्राला मिळाले. अमूर्त गणिताच्या अनेक नव्या शाखा या शतकात चालू झाल्या.

वर्षानुवर्षे न सुटू शकणारे प्रश्न चुटकीसरशी सोडवणारी गणकयंत्रे या शतकाच्या उत्तरार्धात निघाली. विश्वाचे विराट दर्शन आणि अणूच्या अंतरंगाचे सूक्ष्म दर्शन मानवाला आज पहायला मिळत आहे. जीवशास्त्राच्या मुळाशी असलेला डी.एन.ए. रेणू शास्त्रज्ञांना सुमारे सहा दशकांपूर्वी गवसला. विज्ञानाची ही गरुडझेप तंत्रज्ञानाच्या रूपाने मानवी जीवन अधिक प्रगत, विकसित करायला कारणीभूत ठरली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.