Chakan News : जमिनीच्या पैशांच्या वादातून दोन भावांमध्ये हाणामारी

एमपीसी न्यूज – जमिनीच्या पैशांच्या वादातून दोन सख्ख्या भावांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. लहान भाऊ आणि त्याच्या मुलाने मोठा भाऊ आणि त्याच्या मुलाला मारहाण केली. ही घटना 24 जून रोजी रात्री गवारवाडी पाईट येथे घडली.

अशोक हरिभाऊ डांगले (वय 60, रा. गवारवाडी पाईट, ता. खेड) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल विलास डांगले, विलास हरिभाऊ डांगले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अशोक डांगले आणि आरोपी विलास डांगले हे सख्खे भाऊ आहेत. फिर्यादी हे आरोपीच्या घरासमोर जाऊन जमिनीचे जमा झालेले पैसे मागत होते. त्यावेळी त्यांचा भाऊ विलास डांगले आणि त्याचा मुलगा राहुल यांनी फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला धक्काबुक्की केली. काठीने डोक्यात मारून जखमी केले. तसेच फिर्यादी यांच्या मुलाला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.