Pune News : तळजाईच्या जंगलात पुन्हा आग, काही दिवसांपासून वाढल्या आगीच्या घटना

एमपीसी न्यूज : पुणेकरांना प्राणवायू देणाऱ्या तळजाईच्या जंगलात रविवारी रात्री आग लागल्याचा प्रकार उघडकीस आलाय. तळजाई टेकडीतल वनक्षेत्राला लागून असलेल्या सीमा भिंतीजवळ आग लागल्याने अनेक झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. मागील काही दिवसांपासून तळजाईच्या जंगलात आग लागण्याचा घटनेत वाढ होताना दिसत आहे. प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे.

रविवारी संध्याकाळच्या सुमारास आग लागल्यानंतर स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांना याची माहिती दिली होती. परंतु अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचण्यासाठी पाऊण तासाचा कालावधी लागला. याकाळात आगीने मोठे रूप धारण केले आणि अनेक झाडे या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. वनक्षेत्रात आग लागली तर अग्निशामन दलाची एखादी गाडी तातडीचा उपाय म्हणून वनखात्याने ठेवली पाहिजे. जेणेकरून जर अशी काही घटना घडली तर आगीला तात्काळ आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होतील.

आग लागली की लावली?

तळजाई टेकडी हा पुणेकरांसाठी एक प्रकारचा श्वास मानला जातो. अनेक पुणेकर सकाळी संध्याकाळी इथे फिरण्यासाठी येत असतात. पण तळजाई टेकडीवर असलेल्या आतील जंगलामध्ये अनेक अनैसर्गिक कृत्य देखील होताना अनेकदा पाहायला मिळतात. टेकडीच्या आतील भागात अनेकदा दारू पार्टी सुधारलेल्या आपण पाहिल्या आहेत. मग जाणून-बुजून कुणी आग लावत आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.