Chinchwad Crime News : पाच सराईत गुन्हेगारांना अटक; आठ पिस्तुल जप्त

एमपीसी न्यूज – पाच सराईत गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून आठ पिस्तुल, एक रिव्हॉलर आणि 11 जिवंत काडतूसे हस्तगत करण्यात आली आहे. ही कामगिरी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने केली आहे.

प्रताप ऊर्फ बाळ्या हनुमंत पवार (वय 29, रा. पिरंगुट, ता. मुळशी), पंकज ऊर्फ बंडा शामसुंदर पारीख (वय 25, रा. रेणापूर, लातूर), गौरव मच्छिंद्र डोंगरे (वय 23, रा. बलुतआळी, चाकण), शंकर शिवाजी वाडेकर (वय 30, रा. भांबोली, ता. खेड) आणि अजय बिंदूमाधव सातपुते (वय 25, रा. हिंजवडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पवार याच्याकडून दोन पिस्तुल व तीन जिवंत काडतूसे हस्तगत केली. आरोपी पारीख याच्याकडून दोन पिस्तुल व दोन जिवंत काडतूसे हस्तगत केली. आरोपी डोंगरे याच्याकडून दोन पिस्तुल, एक रिव्हॉलर आणि तीन जिवंत काडतूस हस्तगत केली. आरोपी वाडेकर याच्याकडून एक पिस्तुल व एक जिवंत काडतूस तसेच आरोपी सातपुते याच्याकडून एक पिस्तुल व दोन जिवंत काडतूसे हस्तगत केली.

आरोपी प्रताप पवार याच्यावर पुण्यातील दत्तवाडी, लातूर जिल्ह्यातील रेणापूर, आणि किनगाव या पोलीस ठाण्यात दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी पारीख याच्यावर लातूर जिल्ह्यातील ग्रामीण, शिवाजीनगर प्रत्येकी एक तर विवेकानंद पोलीस ठाणे आणि वाकड पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन गुन्हे दाखल आहेत. आरोपी डोंगरे याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात मारहाण, प्राणघातक शस्त्र बाळगणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. आरोपी वाडेकर याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. तर आरोपी सातपुते याच्यावर देहूरोड व हिंजवडी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.