Chikhali News : पिस्तूल बाळगल्याप्रकरणी चौघांना अटक

एमपीसी न्यूज – पिस्तूल बाळगल्याप्रकरणी चिखली पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. या चार जणांसह एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 23) दुपारी सव्वा पाच वाजताच्या सुमारास म्हेत्रेवस्ती, चिखली येथे करण्यात आली.

हर्षद कुमार शिंदे (वय 23, रा. शिंदे वस्ती, लोणीकंद), ओमकार उर्फ सोन्या विलास नांगरे (वय 20, रा. आळंदी), अजिंक्य दादासाहेब म्हस्कुटे (वय 23, रा. खामगाव, ता. दौंड), ऋतिक काळूराम शिवले (वय 19, रा. शिंदेआळी, लोणीकंद) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई संतोष सपकाळ यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी इतर लोकांच्या जीवाला हानी पोहोचवण्याच्या इराद्याने तसेच  पिस्तूलाचा वापर करून दखलपात्र गुन्हा करण्याच्या इराद्याने बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगले. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता चिखली पोलिसांनी म्हेत्रेवस्ती, चिखली मधील जय मल्हार हाउसिंग सोसायटी येथे सापळा लावून कारवाई केली. त्यामध्ये पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 35 हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली. त्यातील चार जणांना अटक करण्यात आली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.