Chinchwad Crime News : ज्वलनशील पदार्थांची विनापरवाना साठवणूक करणारे चार जण अटकेत 

एमपीसी न्यूज – ज्वलनशील पदार्थांची विनापरवाना साठवणूक करणा-या चारजणांना पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी (दि.11) काळभोर नगर, चिंचवड येथे हा प्रकार उघडकीस आला. 

ब्रिजेश कुमार पांडे (वय 23, रा. तळवडे ), मनीकुमार कन्हैयालाल कौल (वय 26, रा. तळवडे ), नुरुद्दिन दिलबाशॉ पठाण (वय 38, रा. देहूरोड) आणि संदीप कांतिलाल फुले ( रा. ओटास्किम, निगडी प्राधिकरण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन विश्वासराव सुर्यवंशी ( वय 28) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ज्वलनशील पदार्थांची साठवणूक करण्यासाठी आवश्यक महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, अग्निशमन दल, केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ तसेच व्यापार परवाना व उत्पादन परवाना नसताना ज्वलनशील पदार्थांची विनापरवाना साठवणूक केली. 23 लाख 60 हजार 300 रुपयांचा हा रसायन सदृश्य साठा पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघमारे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.