Sangvi News : विवाहितेचा छळ करून गर्भपात केल्याप्रकरणी सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – घरगुती किरकोळ कारणांवरून विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण केली. कर्ज फेडण्यासाठी तसेच घरखर्चासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. तसेच विवाहितेला गर्भपात करण्यास भाग पाडले. हा प्रकार 10 मार्च 2019 ते 21 एप्रिल 2021 या कालावधीत सुदर्शननगर, पिंपळे गुरव येथे घडला. याप्रकरणी ९ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नदीप भगवान भालेराव (वय 30, रा. पिंपळे गुरव), विशाल नारायण कांबळे (वय 38, रा. दापोडी) आणि दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहिता सासरी नांदत असताना आरोपींनी वेळोवेळी संगनमत करून घरगुती किरकोळ कारणांवरून विवाहितेला शिवीगाळ व मारहाण केली. आरोपी रत्नदीप याने फिर्यादीवर संशय घेऊन शिवीगाळ व मारहाण केली. विवाहितेच्या आई, वडील यांना मारून टाकण्याची रत्नदीप याने धमकी दिली.

कर्ज फेडण्यासाठी व घरखर्चासाठी माहेरहून पैसे आणण्याची विवाहितेकडे मागणी केली. फिर्यादी सहा महिन्यांची गर्भवती असताना त्यांना पिंपरी येथील एका रुग्णालयात तपासणीसाठी नेले. तिथे पती आणि सासरकडील मंडळींनी त्यांना गर्भपात करण्यास भाग पाडले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.