Crypto Currency : क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारात ज्येष्ठ नागरिकाची चार लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज – युएसडीटी ही क्रिप्टो करन्सी (Crypto Currency) खरेदी करण्यास सांगितले. मात्र समोरील व्यक्तीने त्याचे पैसे न देता 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची चार लाख रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना 6 ते 14 मार्च या कालावधीत मोरवाडी रोड, पिंपरी येथे घडली.

विजयकोदंडारामन स्वामिनाथन (वय 64, रा. मोरवाडी रोड, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 85256047752, 81066450908, 7780946191 या मोबाईल क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mobile Theft : चालणाऱ्या तरुणीचा धक्का मारून मोबाईल पळवला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तीने (Crypto Currency) फिर्यादींसोबत व्हाट्सअपद्वारे संपर्क केला. त्याने फिर्यादींना एक अॅप डाउनलोड करून त्यावर रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले. त्यानंतर त्यावरून युएसडीटी ही क्रिप्टो करन्सी खरेदी करण्यास सांगून खरेदी केलेली क्रिप्टो करन्सी एका वेबसाईटवर ट्रान्सफर करायला लावली.

त्यावरून फिर्यादींनी तीन लाख 91 हजार 385 रुपयांची क्रिप्टो करन्सी खरेदी केली. ती आरोपींनी दिलेल्या वेबसाईटवर पाठवली. मात्र आरोपीने फिर्यादींना त्याचे पैसे न देता त्यांची फसवणूक केली. याबाबत फिर्यादींनी तक्रार अर्ज केला होता, त्यावर चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.