Talegaon Dabhade : फ्रेंड्स ऑफ नेचरच्या गिर्यारोहण प्रशिक्षण शिबिरास उत्तम प्रतिसाद

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील फ्रेंड्स ऑफ नेचर असोशिएशनच्या वतीने गिर्यारोहण प्रेमींसाठी घेण्यात आलेल्या दोन दिवसीय मोफत प्रशिक्षण शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला.

एव्हरेस्टवीर राजेश पठाडे यांच्या ‘कामेट’ या डाहुली (ता.मावळ) येथील गिर्यारोहण प्रशिक्षण केंद्रात बेसिक ॲडव्हेंचर कोर्स आयोजित केला होता. पुणे आणि मावळ परिसरातून १२ ते ६५ या वयोगटातील ४५ गिर्यारोहण प्रेमींनी यात सहभाग घेतला.

या शिबिराच्या समारोपासाठी वडगाव विभागाचे वनक्षेत्रपाल हणमंतराव जाधव , वनरक्षक रेखा वाघमारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळीफ्रेंड्स ऑफ नेचर असोशिएशनचे संस्थापक महेश महाजन,अध्यक्ष सुपर्णा गायकवाड यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते सहभागी गिर्यारोहकांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या शिबिरात गिर्यारोहण अवजारांची माहिती व हाताळणी,रोप कॉइलिंग, रोप नॉट्स आणि त्यांचा वापर, रोप ॲकरिंग,रॉक होल्डिंग, रॉक क्लाइम्बिंग,रॅपलिंग, व्हॅली क्रॉसिंग आणि झूमारिंग या सर्वांचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले. तसेच स्लाईड शो द्वारे एव्हरेस्ट मोहिमेसाठी लागणरी पूर्वतयारी, येणाऱ्या अडचणी या विषयी सखोल माहिती देण्यात आली.

एव्हरेस्ट वीर व छत्रपती पारितोषिक वेजेते राजेश पठाडे यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले.या दोन दिवसीय शिबिराचे शिस्तबद्ध नियोजनामुळे शिबिरार्थीं भारावून गेले होते. त्यांनीसमाधान व्यक्त केले.

हनमंतराव जाधव यांनी फ्रेंड्स ऑफ नेचर्सच्या या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे नियोजन फ्रेंड्स ऑफ नेचरच्या,अमित पोतदार,विवेक रामायणे,जय गोरे, यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.