Dehuroad News : आंतरराष्ट्रीय पर्वत दिनानिमित्त “एव्हरेस्ट वीरांसह” शनिवारी घोरावडेश्वर टेकडी चढाई

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ- निसर्गमित्र विभाग, पिंपरी-चिंचवड माउंटेनियरिंग क्लब आणि गिरिप्रेमी संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाच्या निमित्ताने येत्या शनिवारी “एव्हरेस्ट वीरांसह” घोरावडेश्वर टेकडी चढाई आयोजित केली आहे. शनिवारी सकाळी साडेसहा वाजता चढाई होणार आहे.

या वर्षीची आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाची संकल्पना “शाश्वत पर्वतीय पर्यटन” अशी आहे. पर्वतांचे जीवनातील महत्त्व याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी एव्हरेस्टवीर कृष्णा ढोकले यांच्याबरोबर घोरावडेश्वर टेकडीची चढाई करण्याची संधी आहे. सहभाग नोंदवण्यासाठी विजय सातपुते – 94235 73294 यांच्याशी संपर्क साधावा. वय वर्ष 10 व पुढील सर्वांसाठी खुला व मोफत सहभाग घेता येणार आहे.

प्रत्येक सहभागी व्यक्तीस एक स्मृतीचिन्ह (बॅज) व ई-प्रमाणापत्र (सर्टिफिकेट) देण्यात येणार आहे. सहभागासाठी नोंदणी आवश्यक, पूर्व नोंदणी शिवाय सहभाग नोंदवता येणार नाही. नोंदणी गुरुवार 9 डिसेंबर 201 पर्यंत खुली राहील.

सर्व सहयोगी व आयोजक संस्थांच्या स्वयंसेवकांनी सुद्धा नोंदणी करणे आवश्यक आहे.  प्रत्येक सहभागी व्यक्तीने पाण्याची बाटली व डोंगर चढाईसाठी सुयोग्य पेहरावसह असणे अपेक्षित आहे. नोंदणी करताना *”Ghoradeshwar, near Dehu road, Pimpri-Chinchwad”* हा पर्याय निवडावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.