Zomato delivery boy : जेवणाचे पार्सल घेऊन आलेल्या झोमॅटो डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज : जेवणाचे पार्सल घेऊन आलेल्या झोमॅटो डिलिव्हरी बॉयने (Zomato delivery boy) 19 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 40 वर्षीय डिलिव्हरी बॉयने त्या तरुणीचे जबरदस्तीने चुंबन घेतले. येवलेवाडी परिसरातील एका नामांकित सोसायटीत शनिवारी रात्री हा प्रकार घडला. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

रईस शेख (वय 40, रा.कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. 19 वर्षीय तरुणीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी तरुणी येवलेवाडी परिसरातील एका नामांकित सोसायटीत राहते. शनिवारी रात्री तिने ऑनलाईन जेवण मागवले होते. हे पार्सल घेऊन आरोपी रईस शेख रात्री साडेनऊच्या सुमारास तिच्या सोसायटीत आला होता. जेवणाचे पार्सल दिल्यानंतर त्याने फिर्यादीला पिण्याचे पाणी मागितले. पाणी पिल्यानंतर थँक्यू म्हणण्याचा बहाना करून त्याने फिर्यादी यांचा हात हातात घेतला. फिर्यादी यांनी हात सोडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने हात घट्ट पकडून फिर्यादीला जवळ ओढले आणि त्यांच्या गालाचे दोन वेळा चुंबन घेतले.

या सर्व प्रकारानंतर फिर्यादी तरुणीने पोलीस स्टेशन गाठून तक्रार (Zomato delivery boy) दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.

Misbehave of PMPML Conductor : पीएमपीएमएलच्या कंडक्टरची आरेरावी, प्रवासी तरुणीचे ओढले केस

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.