Pune News : कौमार्य भंगाचा ठपका ठेऊन उच्चशिक्षित कुटुंबाकडून सुनेचा छळ

अमेरिकास्थित पतीसह तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज : पुण्यातील एका उच्चशिक्षित कुटुंबीयांनी सुनेवर कौमार्य भंगाचा ठपका ठेऊन तिचा छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. घटस्फोट देण्यासाठी तिचे लग्नाआधी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला आहे.

28 वर्षीय विवाहितेने याप्रकरणी तक्रार दिली असून तिच्या अमेरिकास्थित पतीसह सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिला उच्चशिक्षित आहे. काही दिवसांपूर्वी तिचे लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर ते अमेरिकेत गेले होते. दरम्यान मधुचंद्राच्या पहिल्या रात्री फिर्यादीला ब्लिडिंग का झाले नाही, अशी विचारणा केली. लग्नाच्या आधी कोणासोबत शारीरिक संबंध होते का? अशी विचारणा करून वारंवार भांडण काढली. फिर्यादीला मारहाण करून घटस्फोट देण्यासाठी फिर्यादीवर दबाव टाकण्यात आला.

दरम्यान या सर्व प्रकारानंतर फिर्यादी महिलेने हडपसर पोलिस स्टेशनला तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी 498 अ, 323, 504, 506, 34 इत्यादी कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. हडपसर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.