Pimpri News : शिवजयंती निमित्त खराळवाडी येथे आरोग्य शिबीर

एमपीसी न्यूज – पुण्यश्लोक श्री राजा शिवछत्रपती प्रतिष्ठान तर्फे ‘एक गाव एक शिवजयंती’ खराळवाडी तर्फे महाआरोग्य तपासणी शिबिर, मोफत औषध वाटप व रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 268 जणांनी तपासणी केली.

शिवजयंती निमित्त रविवारी (दि. 13) खराळवाडी येथे आरोग्य शिबीर घेण्यात आले. जनरल तपासणी, कान नाक घसा, स्त्रीरोग, अस्थीरोग, नेत्र तपासणी, त्वचारोग, लहान मुलांचे आजार, हृदयविकार ह्या सर्व तपासण्या करण्यात आल्या. या शिबिराचा 268 लोकांनी लाभ घेतला.

सर्वांना मोफत औषध वाटप करण्यात आले. काहींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात सुविधा करून देण्याचे देखील नियोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिरात देखील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या शिबिरासाठी डॉ डी वाय पाटील मेडिकल हॉस्पिटलने सहकार्य केले. भागवत तरुण मंडळ, महेश मित्र मंडळ, जय भवानी मित्र मंडळ, आरंभ प्रतिष्ठान आदींनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.