Hinjawadi : अॅग्रीमेंटनुसार फ्लॅट न देता महिलेची एक कोटी रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज – अॅग्रीमेंटनुसार फ्लॅट न देता महिलेची एक कोटी रुपयांची फसवणूक केली. महिलेने याबाबत जाब विचारला असता तिच्याशी गैरवर्तन करून विनयभंग केला. ही घटना 24 एप्रिल ते 25 सप्टेंबर या कालावधीत बावधन खुर्द येथे घडली.

याप्रकरणी महिलेने हिंजवडी (Hinjawadi) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुहास लुंकड, मिलिंद लुंकड, संजय लुंकड, दीपक भटेवारा, मयूर पाटील, राजीव गंभीर, प्रशांत गाढवे, विजय मुरकुटे, सुपरवायजर काळे, दोन महिला आणि दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rahatani Crime : चालकानेच चोरली कार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादीस फसविण्यासाठी बनावट नकाशा तयार करून त्याआधारे फ्लॅट तसाच असल्याचे भासवले. फ्लॅट खरेदी करण्यास भाग पाडून त्यांचा विश्वास बसावा, यासाठी खोटा नकाशा अॅग्रीमेंटमध्ये देऊन फिर्यादीची एक कोटी तीन लाख 14 हजार 445 रुपयांची फसवणूक केली. याबाबत फिर्यादीने जाब विचारला असता सुपरवायजर काळे आणि एका अनोळखी पेंटरने फिर्यादीस धमकी देऊन त्यांचा विनयभंग केला. हिंजवडी पोलीस तपास  (Hinjawadi) करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.