Pimpri News : जनसंवाद सभा आठवड्यातून दोनवेळा घ्या; एमआयएमची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने सुरु केलेल्या जनसंवाद सभेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही अत्यंत कौतुकास्पद संकल्पना असून या माध्यमातून शहरातील अनेक अडचणी नागरिकांना थेट मांडता येतात. त्यामुळे जनसंवाद सभा प्रत्येक आठवड्यात दोन वेळा घेण्यात यावी अशी मागणी ऑल इंडिया मजलिस‑ए‑इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाचे शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांनी केली.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात साळवे यांनी म्हटले आहे की, जनसंवाद सभा आठवड्यात सोमवारी सकाळी 10 ते 12 दरम्यान घेण्यात येते. यामुळे अनेकांना वेळेअभावी जनसंवाद सभेत सहभाग घेता येत नाही. शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयात आठवड्यात दोन वेळा सोमवारी सकाळी 10 ते 12 दरम्यान व गुरुवारी सकाळी 10 ते 12/1 च्या दरम्यान जनसंवाद सभा घेण्यात यावी. जेणेकरून अधिकधिक नागरिकांना यात सहभाग घेता येईल. आपल्या समस्या सोडवून घेता येतील तसेच शहर स्तरावर महापालिकेत मधुकर पवळे सभागृहात आठवड्यात एकदा आपल्या प्रमुख उपस्थितीमध्ये जन संवाद सभा आयोजित करण्यात यावी. यामुळे शहर स्तरावरील अडचणीवर चर्चा होईल,  त्या सोडण्यात सोपे होईल असेही निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.