Pimpri News : पवारसाहेबांचा निषेध म्हणजे विरोधकांना सुचलेले सूडबुद्धीचे राजकारण – माजी आमदार विलास लांडे

एमपीसी न्यूज – बालेवाडीतील आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठात उभारण्यात आलेल्या ‘सिंथेटिक ट्रॅक’वर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गाड्यांचा ताफा गेल्यामुळे विरोधकांनी स्वतःला क्रीडा क्षेत्रातील तज्ञ माणून निषेध व्यक्त करत स्वतःचे अज्ञान चव्हाट्यावर आणले आहे.

क्रीडा विश्वाची विशेष आवड असल्याने शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ पुणे शहरात आणले. याच्या माध्यमातून पुण्यात क्रीडा विश्वाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्याकडून क्रिडा नियमांचं उल्लंघन कदापी होणार नाही. कारण, पवारसाहेबांनी कित्येक वर्षे ‘आयसीसी’च्या अध्यक्ष पदावर राहून क्रीडा क्षेत्राचा देशभरातच नव्हे तर देशाच्या बाहेरसुध्दा विस्तार केला आहे.

त्यांच्या पायाला जखम झाल्यामुळे क्रीडा आयुक्तांनीच त्यांच्या गाड्यांच्या ताफ्याला ‘सिंथेटिक ट्रॅक’वर प्रवेश करण्याची परवानगी दिली. त्यामुळे या शूल्लक बाबीचा निषेध करणा-या विरोधकांच्या सूडबुध्दीची किव येते. क्रीडा क्षेत्राची जाण नसणा-यांनी स्वतःची कुवत ओळखून बोलावे असे प्रत्युत्तर माजी आमदार विलास लांडे यांनी विरोधकांना दिले आहे.

बालेवाडीतील आंतरराष्ट्रीय क्रीडा  विद्यापीठात उभारण्यात आलेल्या ‘सिंथेटिक ट्रॅक’वर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गाड्यांचा ताफा गेल्याने विरोधकांकडून टीका केली जात होती. त्याला लांडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. लांडे यांनी म्हटले आहे की,
बालेवाडी येथील स्टेडिअयच्या धावपट्टीवर गाड्यांचा ताफा गेल्यामुळे पवारसाहेबांवर विरोधकांनी टीका करणे म्हणजे सूर्याकडे पाहून थुंकी उडवण्यासारखे आहे.

ती थुंकी स्वतःच्या तोंडावर पडणार हे विरोधकांना कदाचित माहिती नसावे. क्रीडा क्षेत्रात आपले शून्य योगदान असल्याची जाणीव विसरलेल्या विरोधी पक्षाच्या पदाधिका-यांनी स्वतःची कुवत ओळखून बडबड करावी. नको तिथे आपली बुध्दी पाजळण्याचा उद्योग केल्यास स्वतःलाच तोंडघशी पडावे लागणार आहे. याचा निषेध करणे म्हणजे स्वतःचे अज्ञान चव्हाट्यावर आणण्याचाच प्रकार आहे.

क्रीडा विश्वाला गती देणारा व्यक्ती क्रिडाविषयक नियमांचे उल्लंघन कसे करू शकेल, हे विरोधकांना सांगून कळणार नाही. एवढे न समजण्याइतपत विरोधक अज्ञानी असतील याची कल्पना मनाला न पटणारी आहे. केवळ पायाला जखम झाल्यामुळे पवारसाहेबांनी सिंथेटिक ट्रॅकवरती गाड्यांच्या ताफ्याला परवानगी मागितली होती.

त्यावर क्रीडा  आयुक्तांनी परवानगी दिल्यानंतरच गाड्यांचा आतमध्ये प्रवेश झाला. याचा निषेध करणे म्हणजे राजकीय सूडबुध्दीतून सूचलेले विकृत शहानपण म्हणावे लागेल, अशी टीका लांडे यांनी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.