Pimple Gurav News : पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक 

एमपीसी न्यूज – पत्नीला शारीरिक व मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे. 1 एप्रिल 2017 ते 28 मे 2021 दरम्यान सुदर्शन नगर, पिंपळे गुरव याठिकाणी हा प्रकार उघडकीस आला. 

प्रतिक माणिक कांबळे (वय 30, रा. सुदर्शन नगर, पिंपळे गुरव ) असे अटक पतीचे नाव आहे. तसेच सासु मंगल, मंगल यांची बहीण शांताबाई, नणंद ज्योती व ज्योती हीचा पती जगदीश यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी भिमा अंबाजी गायकवाड (वय 52, रा. कात्रज, पुणे ) यांनी शुक्रवारी (दि‌.28) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी पती प्रतिक हा पत्नी श्रुती कांबळे हिला घरगुती कारणावरुन शारीरिक व मानसिक त्रास देत होता. प्रतिकचे एका महिलेशी प्रेमसंबंध होते. याबाबत श्रुती यांना कळाले होते, यावरुन प्रतिक त्यांच्याशी वाद घालून मारहाण करत असे. अखेर याला कंटाळून श्रुती प्रतिक कांबळे (वय 24) हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.