India Corona Update : देशात सव्वातीन लाख कोरोना बळी, 21 लाख सक्रिय रुग्ण  

एमपीसी न्यूज – देशात कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या सव्वातीन लाखांच्या पुढे गेली आहे. मागील 24 तासांत देशभरात 3 हजार 460 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. आजवर 3 लाख 25 हजार 972 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा मृत्यूदर 1.16 टक्के एवढा झाला आहे. सध्या देशात 21 लाख सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

देशात नव्यांन वाढ होणा-या रुग्णांची संख्या निरंतर कमी होत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 1 लाख 65 हजार 553 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 कोटी 78 लाख 94 हजार 800 एवढी झाली आहे. त्यापैकी 2 कोटी 54 लाख 54 हजार 320 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या 24 देशात तासांत 2 लाख 76 हजार 309 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात सक्रिय रुग्णांच्या संख्येत निरंतर घट होत असून, देशात सध्याच्या घडीला 21 लाख 20 हजार 508 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 91.25 टक्के एवढा झाला आहे. देशात आजवर 34 कोटी 31 लाख 83 हजार 748 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 20 लाख 63 हजार 839 चाचण्या शनिवारी (दि.29) करण्यात आल्या आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 21 कोटी 20 लाख 66 हजार 614 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.