Chinchwad News : सात तोळे सोने, 10 लाख रुपये दिले तर सुनेला नांदवते नाहीतर जीव देते; सासूची धमकी

एमपीसी न्यूज – सात तोळे सोने आणि 10 लाख रुपये हुंडा म्हणून माहेरहून आणण्याची मागणी केली. हुंडा न दिल्यास सुनेला नांदवणार नाही. तसेच सून सासरी नांदायला आली तर स्वतः जीव देणार, अशी सासूने धमकी दिली. पतीने पत्नीला भाड्याच्या खोलीत ठेवले. काही कालावधीनंतर पत्नीशी संबंध तोडले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार फेब्रुवारी 2020 ते 25 सप्टेंबर 2021 या कालावधीत मोरेवस्ती चिखली आणि बिजलीनगर चिंचवड येथे घडला.

पती सुधीर कुटे (वय 29), सासू (दोघे रा. मोरेवस्ती, चिखली), नणंद (वय 32, रा. बीड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 26 वर्षीय विवाहितेने चिंचवड पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 28) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या सासरी नांदत असताना आरोपींनी संगनमत करून ‘तुला नोकरीवरून घरी वेळेवर येणे होत नाही. तुला वेळेवर स्वयंपाक करून जेवायला देता येत नाही’ असे म्हणून हाताने मारून शिवीगाळ करून घराबाहेर काढले. फिर्यादीच्या आईला सात तोळे सोने, 10 लाख रुपये हुंडा दिला तर फिर्यादीस नांदायला नेणार. नाहीतर नांदायला नेणार नाही. फिर्यादी सासरी आली तर जीव देईन अशी सासूने धमकी दिली.

त्यामुळे पतीने फिर्यादीला बिजलीनगर येथे भाड्याची खोली करून तिथे ठेवले. ‘तू थोडे दिवस बाहेर रहा. मी येतजात राहीन’ असे पतीने सांगितले. पती काही दिवस फिर्यादीकडे आला. नंतर त्याने फिर्यादीला परत नांदायला घेऊन न जाता फिर्यादीशी संपर्क तोडून सोडून दिले. आमच्या विरोधात पोलिसात तक्रार करू नको असे म्हणत पतीने फिर्यादी यांच्या बँक खात्यात अडीच लाख रुपये पाठवले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.