Weather Update : मान्सून केरळात दाखल, लवकरच महाराष्ट्रात धडकणार 

एमपीसी न्यूज : देशातील जनतेसाठी एक दिलासादायक बातमी आहे. नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल झाल आहे. यापूर्वी, भारतीय हवामान विभागाने (IMD) दोन आठवड्यांपूर्वी बंगालच्या उपसागरात धडकलेल्या ‘असानी’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे शुक्रवारी (27 मे) केरळमध्ये मान्सून सुरू होण्याची शक्यता वर्तवली होती.

केरळात मान्सून दाखल झाल्यावर सात दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होत असतो. आणि आज मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. आता येत्या सात दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार त्यामुळे शेतकऱ्यांच्याही आशा पल्लवित झाल्या आहे.

येत्या दोन ते तीन दिवसांत भारताच्या दक्षिण केरळ किनारपट्टीवर मान्सूनचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याने शुक्रवारी 27 मे रोजी सांगितले. या वर्षी सरासरी अंदाज वर्तवण्यात आलेल्या चार महिन्यांच्या पावसाळी हंगामाची सुरुवात झाली आहे. शेती क्षेत्राच्या कामांना वेग येणार आणि देशात आता मान्सूनचे वारे वाहणार आहे.

मान्सूनचा पाऊस केरळमध्ये नेहमीपेक्षा पाच दिवस अगोदर पोहोचला आहे. भारताच्या इतर भागांप्रमाणेच केरळलाही अलीकडे उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसल्यानंतर मान्सूनमुळे जनतेला काहीसा दिलासा मिळेल. जगातील सर्वात मोठा उत्पादक आणि शेतमालाचा ग्राहक असलेला भारत, सिंचन नसलेल्या जवळपास 50% शेतजमिनीला पाणी देण्यासाठी मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे.

गेल्या महिन्यात, भारतीय हवामान खात्याने सांगितले की, 2022 मध्ये भारतात सरासरी मॉन्सून पाऊस पडेल, ज्यामुळे आशियातील तिसऱ्या-सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेत शेतीच्या चांगल्या उत्पादनातून एकूण आर्थिक वाढीची शक्यता वाढेल.

पुढील पाच दिवसांत केरळ आणि लक्षद्वीपमध्ये हलक्या/मध्यम पावसाचा आणि आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे. हवामान खात्याने येत्या चार दिवसांत जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात हलक्या/मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत उत्तराखंड, उत्तर पंजाब, उत्तर हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पूर्व राजस्थानमधील दुर्गम भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.