Pune News: पुण्यात दारुड्याकडून तरुणाला मारहाण, बीअरची बाटलीच डोक्यात फोडली

एमपीसी  न्यूज: रस्त्यामध्ये दारू पीत बसलेल्या तरुणांना अटक केल्यानंतर चार दारुड्यांनी एका महिलेसोबत असणाऱ्या तरुणाचा डोक्यात बीअरची बाटली फोडून त्याला गंभीर जखमी केले आहे. चतुर्श्रुंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला.

याप्रकरणी सिद्धार्थ लक्ष्मण कट्टीमणी (वय 28 यांनी चतुर्श्रुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सौरभ संजय डोंगरे, अमित देवकर, रोहित देवकर आणि अन्य एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी करून हा मावशी सोबत त्याच्या महाले नगर येथील भाडेकरूकडे भाडे मागण्यासाठी गेला होता. त्यावेळी येथील मोकळ्या जागेत चौघे जण दारू पीत बसले होते. फिर्यादी तरुणाच्या मावशीने इथे दारू पिऊ नका भाडेकरू कसे येणार जाणार असा जाब विचारला. याचा राग आल्याने दारू पिणाऱ्या तरुणांनी फिर्यादीच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली. यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाला असून खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.