India Corona Update : मागील 24 तासांत देशभरात 18,177 नवे रुग्ण, 217 रुग्णांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : मागील 24 तासांत देशभरात 18 हजार 177 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, 217 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  यासह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 03 लाख 23 हजार 965 एवढी झाली आहे. 

आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 20 हजार 923 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 99 लाख 27 हजार 310 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात आज घडीला 2 लाख 47 हजार 220 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

गेल्या 24 तासांत 217 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशभरात 1 लाख 49 हजार 435 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.44 टक्के एवढा आहे तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.12 टक्के एवढं आहे. आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 17 कोटी 48 लाख 99 हजार 783 नमूने तपासण्यात आले आहेत त्यापैकी 9 लाख 58 हजार 125 नमूने शनिवारी (दि.2) तपासण्यात आले आहेत.

देशात मागील सलग तीन दिवसांपासून 20 हजारांहून कमी कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. दुसरीकडे त्याप्रमाणात बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण वाढले असून, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या अडिच लाखांच्या आत आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.