India Corona Update : मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या 10 लाख चाचण्या

एमपीसी न्यूज – देशात मागील 24 तासांत आजवरच्या सर्वाधिक 10 लाख 23 हजार 836 चाचण्या करण्यात आल्या आहेत.  मागील 24 तासांत देशभरात 69,878 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 945 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासांतील रुग्ण वाढीसह देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 29 लाख 75 हजार 702 झाली आहे. त्यापैकी सध्या 6 लाख 97 हजार 330 सक्रिय रुग्ण आहेत तर आजवर तब्बल 22 लाख 22 हजार 578 रुग्ण बरे झाले आहेत.

देशात मागील 24 तासांत 945 रुग्णांचा मृत्यू झाला असून देशात आजवर 55 हजार 794 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात रुग्ण संख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले असून मागील 24 तासांत देशभरात 63 हजार 631 रुग्ण बरे झाले आहेत. देशातील रुग्णांचा रिकव्हरी रेट वाढून 74.69 टक्के एवढा झाला आहे.

आयसीएमआरने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात मागील 24 तासांत आजवरच्या सर्वाधिक 10 लाख 23 हजार 836 नमूणे तपासण्यात आले आहेत. देशात आजवर तब्बल 3 कोटी 44 लाख 91 हजार 073 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.

देशात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश या राज्यांत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या झालेल्या पत्रकार परिषदेत टेड्राॅस घेब्रेयासूस यांनी जगाला कोरोना विषाणू पासून मुक्ती मिळण्यासाठी दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत लागेल. स्पॅनिश फ्लू पेक्षा कमी काळात याचा नायनाट होईल असे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.