India Corona Update : 50 कोटी चाचण्या पूर्ण, ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 150 दिवसांतील निच्चांकी

एमपीसी न्यूज – भारतात 50 कोटी कोरोना चाचण्यांचा महत्वपूर्ण टप्पा पूर्ण झाला आहे. आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 50 कोटी 26 लाख 99 हजार 702 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 18 लाख 86 हजार 271 नमूने तपासण्यात आले आहेत. दुसरीकडे देशात मागील 150 दिवसांतील निच्चांकी ॲक्टिव्ह रुग्णसंख्या नोंदवली आहे.

भारतात गेल्या 24 तासांत 36 हजार 571 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 23 लाख 58 हजार 829 एवढी झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना रुग्णापैकी 3 कोटी 15 लाख 61 हजार 635 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 36 हजार 555 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्याच्या घडीला देशात 3 लाख 63 हजार 605 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. भारतात आजवर 4 लाख 33 हजार 589 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 540 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.33 टक्के एवढा आहे तर, रिकव्हरी रेट 97.54 टक्के एवढा आहे.

लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशात आत्तापर्यंत 57 कोटी 16 लाख 71 हजार 264 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 48 लाख 84 हजार 440 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.