Innerwheel Club : पर्यावरण पूरक गौरी गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात

एमपीसी न्यूज : इनरव्हील क्लब (Innerwheel Club of Talegaon Dabhade) ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पर्यावरण पूरक गौरी गणपती सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. या स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरणाचा समारंभ उत्साहात पार पडला. क्लब सदस्यांमध्ये चार तर इतर स्पर्धकांमधून पाच क्रमांक काढण्यात आले. अध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी सर्व सहभागी स्पर्धकांचे आभार मानले व विजयी स्पर्धकांचे अभिनंदन केले.

यावेळी प्रोजेक्ट चेअरमन अर्चना देशमुख, मुग्धा जोर्वेकर, रेणुका जाधव व अल्पना हुंडारे यांनी निकाल जाहीर केले. परीक्षक म्हणून शर्मिला शाह, सुजाता खंडागळे व प्रणाली शेंडे यांनी काम पाहिले.

क्लब सदस्य व नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग दाखवला, निकाल जाहीर करताना क्लब सदस्य व इतर नागरिक यांच्यामध्ये वेगवेगळे नंबर काढण्यात आले. क्लब सदस्य यांचेमधून चार नंबर व इतर सहभागी यांच्यामधून पाच नंबर काढण्यात आले.

Vadgaon Maval : वडगाव राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने गॅस सिलेंडर व सुविधा पुरवण्याची मागणी

निकाल पुढील प्रमाणे – सहभागी नागरिक (Innerwheel Club)  

प्रथम क्रमांक – सुप्रिया राजेश चौधरी व स्नेहल चौधरी, द्वितीय क्रमांक – दिपा गायकवाड, तृतीय क्रमांक – दिपाली जोशी, चतुर्थ क्रमांक – रविशा गराडे, पाचवा क्रमांक – गीता शिंदे

क्लब अंतर्गत काढण्यात आलेले क्लब सदस्यांमधील निकाल पुढील प्रमाणे

1) तेजस्विनी खळदे
2) सीमा खळदे
3) मीरा बेडेकर
4) दिपा राऊत

अध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी प्रास्ताविक केले,संध्या थोरात यांनी आभार मानले. माजी अध्यक्षांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निशा पवार,अनुप्रिया खाडे, सोनाली शुक्ल,दिपा पराड,मोनाली शुक्ल,काजल गारोळे,प्रिया मानकर,वैभवी कारके यांनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.