Punyabhumi Moshi : मान खाली घालावी लागेल असे काम करणार नाही – महेश लांडगे

एमपीसी न्यूज – या भागाचा आमदार म्हणून यापूर्वी काहींनी काम केले आहे. माझ्या नंतरही कोणीतरी या पदावर असेल. परंतु, मी काम करत असताना असे कोणतेही काम करणार नाही की, ज्यामुळे माझ्या मतदारांना किंवा मला शरमेने मान खाली घालावी लागेल असे मत भाजपाचे शहराध्यक्ष, भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले. पुण्यभूमी मोशी (Punyabhumi Moshi) या पुस्तकाचे प्रकाशन करत असताना लांडगे बोलत होते. संतोष बारणे, नितीन थोरात व डॉ. प्रकाश कोयाडे उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, मी केलेल्या कामासंदर्भात काही जण टीका करत आहेत. परंतु मी कधीही कोणावरही टीका केलेली नाही तसेच मी माझ्या कार्यकर्त्यांनाही सांगत असतो की आपण आपले काम करत राहायचे कोणावरही टीका करायची नाही. मला माहित आहे की कधी ना कधी या पदावरून आपल्याला दूर व्हावे लागणार आहे. त्यामुळे मी जनसेवेचे काम करत असताना माझ्याकडून कोणतीही चूक होऊ देत नाही.

मोशी (Punyabhumi Moshi) येथील नागेश्वर महाराज उत्सव हा सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहे येथील भंडाऱ्याचा कार्यक्रम नक्कीच अनुभवला पाहिजे. ज्या एकोप्याने व सामाजिक सलोख्याने हा उत्सव साजरा होतो त्याचा मोशीतील प्रत्येकालाच अभिमान आहे.

Rakshak Matrubumiche : सेना दलात प्रवेश म्हणजे ‘सुरक्षित’ भविष्याची खात्री आणि देशसेवेची संधी – ब्रिगेडियर हेमंत महाजन

पुण्यभूमी मोशी (Punyabhumi Moshi) हे पुस्तक म्हणजे मोशी चा इतिहासाचा दस्तऐवज आहे. मोशीकरांनी ते पुस्तक परिपूर्ण व्हावे यासाठी यामध्ये ज्या गोष्टी उल्लेख केल्या गेल्या पाहिजे त्याची माहिती द्यावी म्हणजे हे पुस्तक परिपूर्ण करता येऊ शकेल असेही लांडगे यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.