Yawat News : रायगड जिल्ह्यातून अपहरण झालेल्या मुलीची यवत पोलिसांकडून सुटका

एमपीसी न्यूज – रायगड जिल्ह्यातून अपहरण झालेल्या अडीच वर्षाच्या मुलीची यवत पोलिसांकडून सुटका करण्यात आली आहे.

2.5 वर्षाच्या मु्लीचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले होते त्याबाबत गुरुवारी (दि.8) रसायनी पोलीस ठाणे, जिल्हा रायगड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यवत पोलीस ठाण्याचे निरीक्षक नारायण पवार यांना माहितीदारांकडून माहिती मिळाली की, अपहरण झालेली मुलगी दोन व्यक्तींसह सोलापूरच्या दिशेला जात आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पवार यांच्या सूचनेनुसार पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, पोलीस अंमलदार गणेश मुटेकर, सोमनाथ सुपेकर आदींनी पाटस टोल नाक्यावर रचला आणि मिळालेल्या माहितीवरून या अडीच वर्षाच्या मुलीला ताब्यात घेतले.तसेच त्या मुलीसोबत पाटस चौकीच्या पथकाने पुणे सोलापूर महामार्गावरील टोल नाक्यावर एक महिला व एक पुरुष यांनाही ताब्यात घेतले.संबंधीत मुलीस एक महिला व सोबतच्या व्यक्तीसह यवत पोलीस ठाण्याने रसायनी पोलीस ठाणे, रायगड जिल्हाचे सहायक पोलीस निरीक्षक धनाजी काळे व त्यांच्या पथकाकडे पुढील तपासासाठी ताब्यात दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.