Maharashtra Corona Update: सलग दुसऱ्या दिवशी राज्यात 16 हजार रुग्ण तर, 296 रुग्णांचा मृत्यू

राज्यात सध्या 1 लाख 93 हजार 548 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील 5 लाख 62 हजार 401 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी 16 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात आज 16 हजार 408 नवीन रुग्ण आढळले असून 296 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 7 लाख 80 हजार 689 एवढी झाली आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या 1 लाख 93 हजार 548 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील 5 लाख 62 हजार 401 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आज दिवसभरात 296 रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील एकूण कोरोना मृतांची संख्या 24 हजार 399 एवढी झाली आहे.

राज्यात सध्या सर्वाधिक सक्रिय रुग्ण हे पुण्यात आहेत. पुण्यात सध्या 51 हजार 909 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबई आणि ठाण्यात सध्या प्रत्येकी 20 हजार सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील मृत्यूदर 3.13 टक्के आहे. राज्यात आज दिवसभरात 7 हजार 690 बरे झालेल्या रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 72.04 टक्के आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 40 लाख 84 हजार 754 नमुन्यांपैकी 7 लाख 80 हजार 889 नमुने पॉझिटिव्ह (19.11 टक्के) आले आहेत. राज्यात 13 लाख 09 हजार 676 लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. सध्या 35 हजार 373 लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.