Maharashtra Corona Update : राज्यातील ॲक्टिव्ह कोरोना रुग्णसंख्या पन्नास हजारांचा खाली

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (रविवारी) दिवसभरात 3,502 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 9,815 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला. दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील ॲक्टिव्ह कोरोना रुग्णसंख्या पन्नास हजारांचा खाली आली आहे. 
सध्याच्या घडीला राज्यात 45 हजार 905 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 78 लाख 42 हजार 949 एवढी झाली आहे. त्यापैकी 76 लाख 49 हजार 669 जण बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.54 टक्के एवढा झाला आहे.

राज्यात आज 17 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजवर 1 लाख 43 हजार 404 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.82 टक्के एवढा आहे. आजवर 7 कोटी 64 लाख 37 हजार 416 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. सध्या महाराष्ट्रात 2,380 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत तर, 2,94,500 जण होम क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.