Maval Encroachment Action : पवनानगर रोडवर पीएमआरडीएची अतिक्रमण कारवाई

एमपीसी न्यूज – कामशेत पवनानगर रोडवरील (Maval Encroachment Action) नैसर्गिक ओढ्यावर केलेल्या अतिक्रमणावर पीएमआरडीएने आज (बुधवारी, दि. 25 मे) कारवाई केली. स्थानिक रहिवासी गणेश लालगुडे यांनी याप्रकरणी संबंधित विभागाशी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
Maval Encroachment Action
कामशेत येथे पवनानगर रोडवरील नैसर्गिक ओढ्यावर अतिक्रमण झाले होते. हे अतिक्रमण झाल्यावर गणेश लालगुडे यांनी तहसीलदार, पीएमआरडीए व संबंधित विभिगाशी पत्रव्यवहार केला. पत्रव्यवहार करून सुद्धा  अतिक्रमण वाढत राहिले. यामुळे गणेश लालगुडे व ग्रामस्थ यांनी यासंदर्भात उपोषण केले होते. त्यावर तहसीलदार यांनी लेखी निवेदन दिले होते. या निवेदनामुळे उपोषण मागे घेण्यात आले होते.
Maval Encroachment Action 3
तहसीलदारांनी लेखी आश्वासन देऊनही कारवाई (Maval Encroachment Action) झाली नाही, म्हणून शेवटी मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा देण्यात आला होता. या सर्व तक्रारीचा परिणाम म्हणून पीएमआरडीने कारवाईचा हातोडा उचलला. या संदर्भात संबंधी व्यक्तीस नोटीस बजावण्यात आली होती.

 

ही कारवाई करताना पीएमआरडीएचे अधिकारी चौगुले व त्यांचे सहकारी, यंत्रसामग्री, पोलीस यंत्रणा, रुग्णवाहिका यावेळी उपस्थित होते. ही कारवाई केल्यामुळे येथील झोपडपट्टी धारकांना व शेतकऱ्यांना न्याय मिळाला असे गणेश लालगुडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.