Pune Crime News : मनसेचे वसंत मोरे, साईनाथ बाबर यांच्यासह 125 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेत निदर्शने करण्यास मनाई असतानाही मोठा जमाव गोळा करून आंदोलन केल्याप्रकरणी मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांच्यासह शंभर-सव्वाशे जणांविरुद्ध पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 14 मार्च रोजी महापालिकेत हे आंदोलन झाले होते. या प्रकरणी अशोक राजाराम बनकर यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महानगरपालिकेच्या नवीन इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर वसंत मोरे साईनाथ बाबर आणि इतर आरोपी सुरक्षारक्षकांना न जुमानता आत गेले. महापालिका इमारतीच्या आवारात कोणत्याही प्रकारची आंदोलन करण्यास मनाई असतानाही आदेशाचा भंग करून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाबाहेर पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी आंदोलन केले.

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक नाईकवाडे अधिक तपास करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.