Pimpri News : महापालिकेची अनधिकृत बांधकामांवरील धडक कारवाई सुरुच

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने सलग चौथ्यादिवशी धडक कारवाई सुरु ठेवली आहे. रावेत, मोशी, पिंपळेसौदागर येथील अनधिकृत बांधकामांवर आज (मंगळवारी) कारवाई करण्यात आली.

महापालिका प्रशासनाने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरु केली आहे. अनधिकृत बांधकामे, पत्राशेड, टप-या काढण्यात येत आहेत. शहराच्या वेगवेगळ्या भागात दररोज कारवाई सुरु आहे.

‘ब’ क्षेत्रीय कार्याअंतर्गत पवना नदी पात्रातील रावेत येथील व्यावसायिक पत्राशेडवर कारवाई तेली. 2 आरसीसी, 3 वीट बांधकाम आणि 41 पत्राशेड पाडण्यात आले. ‘क’ क्षेत्रीय कार्यालायअंतर्गत पुणे-नाशिक महामार्गावरील बनकर वस्ती ते मोशी टोल नाक्यापर्यंतची रस्ता रुंदीतील अतिक्रमणावार कारवाई केली. 25 आरसीसी बांधकाम, 35 वीट बांधकाम आणि 11 पत्राशेड अशी 71 अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. 39 हजार 252 चौरस फुट क्षेत्रफळावर कारवाई केली. ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत पुणे -नाशिक 61 मीटर दुतर्फा रस्ता रुंदीमधील 9 आरसीसी बांधकामे पाडण्यात आली.

‘ड’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत अनधिकृत व्यावसायीक पत्राशेडवर आज कारवाई करण्यात आली. शिवार चौक ते कुंजीर चौक, कुणाल आयकॉन रोड पिंपळे सौदागर येथील 53 अनधिकृत व्यवसायिक पत्राशेडवर कारवाई केली. अंदाजे 50,000 चौरस फुट अनाधिकृत बांधकामे निष्कासित केले.

अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, सहशहर अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.