Crime News : कामानिमित्त नेलेल्या कारचा परस्पर अपहार

एमपीसी न्यूज – कामानिमित्त नेलेल्या कारचा एका व्यक्तीने मालकाला कोणतीही कल्पना न देता अपहार केला.ही घटना 15 मे ते 29 ऑगस्ट या कालावधीत यमुनानगर निगडी येथे घडली.

जशवंत रावधन सिंगराव दळवी (वय 34, रा. यमुनानगर, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून विवेक कल्याण सोमवंशी (वय 34) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची रेनॉल्ट डस्टर कार विवेक कल्याण सोमवंशी याने कामानिमित्त नेली.ती कार त्याने तीन महिन्यांनंतरही फिर्यादी यांना परत केली नाही.फिर्यादी यांच्या 13 लाख 64 हजार 435 रुपये किमतीच्या कारची परस्पर विल्हेवाट लावून अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.