Nigdi News : दोन दिवसीय ‘आयटी कॉनक्लेव’ मध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन 

एमपीसी न्यूज – औद्योगिक तंत्र शिक्षण संस्थेच्या इन्स्टिटयूट ऑफ इंडस्ट्रियल अँड कॉम्प्युटर मॅनॅजमेन्ट अँड रिसर्च, निगडी या संस्थेत दोन दिवसीय आयटी कॉनक्लेव्ह 2020 हा विद्यार्थी विकास उपक्रम आयोजित करण्यात आला होता. कोरोना संसर्गामुळे कार्यक्रमाचे आयोजन ऑनलाइन मायक्रोसॉफ्ट टीम्स वर करण्यात आले होते. याप्रसंगी एमसीए डायरेक्टर डॉ. दिपाली सवाई यांनी आयॊटी, आर्टीफिशीयल इंटेलिजन्स, ब्लॉकचेन, बिग डेटा अशा काही ट्रेंडिंग टेकनॉलॉजिस बद्दल थोडक्यात मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी क्षमेश अतनूरकर (एकसेन्चुर) यांनी डॉकर आर्किटेक्चर आणि इंस्टॉलेशन याबद्द्ल मार्गदर्शन केले. श्रीरंग कांबळे(इन्फोसिस) यांनी प्रॉडक्ट लाईफसायकल बद्दल माहिती दिली. सोनाली डांगरे (सिनेक्रोन टेकनॉलिजिएस) यांनी इटीएल टेस्टींग बद्दल सांगितले. मनीष राज (आयबीएम,युके) यांनी रेसिलियन्स इंजिनीरिंग विषयी माहिती दिली. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवसाची सुरूवात क्लाऊड कॉम्प्युटिंग बद्दलच्या संकल्पनानी झाली. झोरिएन्ट सोल्युशनचे नितीन जेनेकर यांनी जनीं ऑफ क्लाऊड कॉम्प्युटिंग बद्दल मार्गदर्शन केले. सॅप (SAP) इंडिया प्रा लि. कंपनीचे आशुतोष तोडकर यांनी SAP टेकनॉलॉजिस विषयी माहिती दिली.

समारंभाच्या शेवटी ‘मॅपिंग ऑफ टेकनॉलॉजिस अँड स्किल सेटस टू स्टार्ट द करिअर पोस्ट पँडेमिक’ या विषयावर मार्गदर्शनपर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यात आशिष शर्मा(बार्कलेज), नवनाथ काळे (DRDO, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स), अजिंक्य कासार (कॅपिटा), अतुल राजगुरू (प्लेक्स सिस्टिम्स), राहुल कुमार (सायंटिफिक गेम्स कॉर्पोरेशन) सहभागी झाले होते. कार्यक्रमाप्रसंगी पूजा कलंगे, विनीत बन्सल (एमसीए -3) आणि आकाश कुंभार (एमसीए -3) यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन एमसीए विभाग प्रमुख रेणू मॅथ्यू यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.