Omicron News : शहरात आज ‘ओमायक्रॉन’चे 4 नवीन रुग्ण; थायलंड, जपान, दक्षिण आफ्रिकेवरून परतले शहरात

एमपीसी न्यूज – कोरोनाचा नवीन विषाणू असलेल्या ‘ओमायक्रॉन’चा संसर्ग झालेले 4 नवीन रुग्ण आज (बुधवारी) पिंपरी-चिंचवड शहरात सापडले आहेत. त्यामध्ये 2 महिला, 1 पुरुष आणि 1 लहान मुलीचा समावेश आहे. हे रुग्ण थायलंड, जपान, दक्षिण आफ्रिकेवरून शहरात परतले आहेत. सर्व रुग्ण नवीन भोसरी रुग्णालयात दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. आजपर्यंत शहरातील 22 आणि बाहेरील 1 अशा 23 रुग्णांची नोंद झाली आहे.

आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ओमायक्रॉन या नव्या उत्परिवर्तित विषाणूचा प्रादुर्भाव होत आहे. केंद्र व राज्य शासनाने खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सूचित केले आहे. त्यानुसार महापालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटच्या अनुषंगाने महापालिकेतर्फे तपासणी मोहीम सुरू आहे. थायलंड, जपान आणि दक्षिण आफ्रिकेतून शहरात आलेले 3 जण आज पॉझिटीव्ह आले आहेत. तर, 1 रुग्ण रँन्डम तपासणीत ओमायक्रॉन पॉझिटीव्ह आला. सर्व रुग्ण नवीन भोसरी रुग्णालयात दाखल आहेत.

ओमायक्रॉनच्या 10 सक्रिय रुग्णांवर उपचार; 13 संसर्गमुक्त  

आजपर्यंत परदेशातून शहरात आलेले व त्यांच्या संपर्कातील अशा 1539 जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील 1444 जणांचे अहवाल प्राप्त झाले. परदेशातून आलेले 31 तर त्यांच्या संपर्कातील 26 जण पॉझिटिव्ह आले. तर, 1387 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले. परदेशातून आलेल्या 31 पॉझिटीव्ह रुग्णांपैकी 13 जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली.

संपर्कातील 26 पॉझिटीव्ह रुग्णांपैकी 9 ओमायक्रॉन पॉझिटीव्ह होते. तर, रँन्डम तपासणीत 1 रुण ओमायक्रॉन पॉझिटीव्ह आला. 13 जण ओमायक्रॉन संसर्गमुक्त झाले आहेत. तर, 10 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.