Chakan Crime News : विक्रीसाठी गुटखा, पानमसाल्याची साठवणूक; एकाला अटक, 8.25 लाखाचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – विक्रीसाठी गुटखा, पानमसाल्याची साठवणूक केल्याप्रकरणी एकाला अटक केली आहे. पोलिसांनी 8.25 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चाकण विद्याधाम कॉलनी, मार्केटयार्ड येथील सिरवी ट्रेडर्स नावाच्या किराणा दुकानात ही कारवाई केली आहे.

सवाराम रताराम चौधरी (वय 39, रा. विद्याधाम कॉलनी, मार्केटयार्ड, चाकण) असे अटक आरोपीचे नाव आहे. हनुमान जाट (रा. म्हाळुंगे) या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. याबाबत पोलीस शिपाई अशोक दौलत गारगोटे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने शासनाने प्रतिबंधित केलेला 95 हजार 734 रूपये किंमतीचा गुटखा आणि पान मसाला जवळ बाळगला होता. पोलिसांनी याठिकाणी छापा टाकून सात लाख रूपये किंमतीची कार, तीस हजार रुपयांचा मोबाईल आणि गुटखा व पानमसाला असा एकूण 8 लाख 25 हजार 737 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एकाला अटक केली असून, चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.