Lonavala Crime News : गांजा विक्रीसाठी आलेल्या एकास अटक

एमपीसी न्यूज – गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला लोणावळा शहर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 18) दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास श्रीरामवाडी, गवळीवाडा ते इंद्रायणीनगर रोडवर करण्यात आली.

दिलीप वामन जाधव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक लक्ष्मण उंडे यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिलीप जाधव गांजा विक्रीसाठी श्रीरामवाडी येथे आला असल्याची माहिती लोणावळा शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गवळीवाडा ते इंद्रायणी नगर रोडवर सापळा लावून कारवाई केली. पोलिसांनी दिलीप जाधव याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 18 प्लास्टिक पुड्यांमध्ये 380 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी 5 हजार 170 रुपयांचा गांजा जप्त केला. हा गांजा तो विक्रीसाठी आला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. लोणावळा शहर पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.