Pimple Saudagar Crime News : रस्त्याने चाललेल्या महिलेचा अनोळखी इसमाकडून विनयभंग

एमपीसी न्यूज – रस्त्याने चाललेल्या महिलेचा अनोळखी इसमाने विनयभंग केला आहे. शुक्रवारी (दि. 29) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास निसर्ग निर्माण सोसायटी समोर, पिंपळे सौदागर येथे हा धक्कादायक प्रकार घडला.

याप्रकरणी पिडित महिलेनं शुक्रवारी (दि. 29) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरून आलेल्या आरोपी विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला रस्त्याने जात असताना दुचाकीवरून आलेल्या आरोपीने त्यांचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.