Pimpri News : कंत्राटी सुरक्षा रक्षकांना साप्ताहिक सुट्टी मिळावी, युथ कॉंग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत सुरक्षा रक्षक या पदावर सुमारे 1300 कर्मचारी कंत्राटी पद्धतीने आहेत. त्यांना साप्ताहिक सुट्टी लागू करण्याची मागणी युथ कॉंग्रेसने केली आहे.

याबाबत आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) 1981 चा महाराष्ट्र अध्यादेश 5 नुसार साप्ताहिक आणि इतर सुट्या संबंधित शर्ती व त्या सुट्यांबाबतचा पगार यांचे नियमन करणे, याबाबत तरतूद करण्यात आली आहे. असे असताना संबंधित ठेकेदार या सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुट्टी का देत नाही ? याची चौकशी करून, सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुटी जाहीर करावी.

आठ तास ड्यूटीऐवजी 12 तास काम करून घेतले जाते. ‘ईएसआय’ व ‘पीएफ’ची रक्कम वेळेत भरली जात नाही. किमान वेतन दराने वेतन दिले जात नाही. पगार स्लीप मिळत नाही. शासकीय नियमाप्रमाणे आरोग्य सेवा देण्यात यावी. कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर मिळत नाही. ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.