Nigdi Crime News : अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी इसमाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी इसमाचा मृत्यू झाला. भक्ती शक्ती चौकाकडून अंकुश चौक निगडी येथे रविवारी (दि.17) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

साहेबराव हनुमंत गायकवाड (वय 51, रा. किवळेगाव, हवेली) असे या अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. आतिष विठ्ठल गायकवाड (वय 30, रा. रा. किवळेगाव, हवेली) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे चुलते मयत साहेबराव गायकवाड हे किवळे गाव येथून रस्ताने पायी जात होते. त्यावेळी अज्ञात वाहन चालकाने त्यांना धडक दिली. आमध्ये गंभीर जखमी झालेल्या साहेबराव गायकवाड यांचा मृत्यू झाला आहे. निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.